एलटीटी-लखनऊ व प्रयागराजदरम्यान विशेष गाड्या धावणार


भुसावळ : रेल्वेला प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनऊ आणि प्रयागराज दरम्यान उत्सवासाठी विशेष उत्सव गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनऊ उत्सव विशेष गाडी
डाऊन 02107 लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनऊ उत्सव विशेष गाडी 16 डिसेंबर ते 30 जानेवारीदरम्यान दर सोमवार, बुधवार शनिवारी प्रस्थान स्टेशनहून 4.25 वाजता रवाना होईल आणि दुसर्‍या दिवशी लखनऊ स्टेशन 3.30 वाजता पोहोचणार आहे. अप 02108 लखनऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस उत्सव विशेष गाडी 17 डिसेंबर ते 31 जानेवारीदरम्यान दर मंगळवार, गुरुवार, रविवारी प्रस्थान स्टेशनहून 10.45 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनला 9.50 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, भोपाल, ललितपूर, झांशी, ओरा, कानपुर सेंट्रल रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक एसी टू टायर, चार एसी थ्री टीयर, 12 स्लीपर क्लास, तीन सेकंड क्लास सीटींग बोगी जोडण्यात येणार आहे.


लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज उत्सव विशेष गाडी
डाऊन 02153 लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज उत्सव विशेष गाडी 15 डिसेंबर ते 26 जानेवारीदरम्यान दर मंगळवारी प्रस्थान स्टेशनहून 4.30 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी प्रयागराज स्टेशन 4.40 वाजता पोहोचणार आहे. अप 02154 प्रयागराज लोकमान्य टिळक टर्मिनस उत्सव विशेष गाडी 16 डिसेंबर ते 26 जानेवारीदरम्यान दर बुधवारी प्रस्थान स्टेशनहून सात वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन 4.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, इटारसी, पिपरीया, नरसिंहपूर, जबलपुर, कटनी, मैहर, सतना रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक फर्स्ट एसी, चार एसी टू टीयर, 13 एसी थ्री टीयर, एक पँट्री कार बोगी जोडण्यात येणार आहे.

आरक्षित तिकीट असल्यानंतरच प्रवेश
आरक्षित गाड्यांमध्ये केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच गाडीत प्रवेश दिला जाणार असून प्रवाशांना कोविड नियमांचे पालन करावे लागणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !