साकेगावात ग्रामपंचायत मंगल कार्यालय व सभागृहाचे लोकार्पण


ग्रामस्थांना अवघ्या 11 हजारात मंगल कार्यालय उपलब्ध होणार

भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून भव्य मंगल कार्यालय व सभागृह उभारण्यात आल्यानंतर शुक्रवारी आमदार सावकारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याचे लोकार्पण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती मनीषा पाटील, पंचायत समिती सदस्य प्रीती पाटील, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, उपसभापती वंदनाताई उन्हाळे यांचे पती उन्हाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन दिलीपसिंग पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, सुभाष कोळी आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


35 हजार स्वेअर फूट जागेत बांधकाम
खासदारांसह आमदारांनी 40 लक्ष रुपये साकेगाव स्मार्ट व्हिलेज मंगल कार्यासाठी आपल्या फंडातून दिल्यानंतर मंगल कार्यालय गावाच्या बाहेर चुडामण नगरातील 35 हजार ओपन स्पेस जागेत बांधकाम सुरू करण्यात आले. शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 रोजी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्मार्ट व्हिलेज मंगल कार्यालय सभागृहाचे भव्य आणि दिव्य लोकार्पण सोहळा पार पडला. ग्रामस्थांना अवघ्या 11 हजार रुपयात ग्रामस्थांसाठी मंगल कार्यालय उपलब्ध होणार आहे.

भविष्यात निश्‍चित पुरस्कार प्राप्त करणार
आमदार संजय सावकारे यांनी मनोगतात साकेगाव ग्रामपंचायत आदर्श व उत्कृष्ट ग्रामपंचायत असून ग्रामपंचायतीचा विकासाचा आलेख लक्षात घेता निश्चित भविष्यात स्मार्ट व्हिलेज साकेगाव ग्रामपंचायत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करेल, असा विश्वास त्यांनी मंगल कार्यालय सभागृहाच्या लोकार्पणप्रसंगी व्यक्त केला.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी सरपंच आनंद ठाकरे, सुरेश पाटील, माणिक पाटील, अनिल सोनवाल, संतोष भोळे, दिगंबर पाटील, गजानन कोळी, बळीराम सोनवणे, कालू पटेल, महेंद्रकुमार प्रमोद चव्हाणसह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन आनंद ठाकरे यांनी केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !