भुसावळात वायरमनला मध्यरात्री कामावर असतांना मारहाण


भुसावळ : शहरातील इदगाह रस्त्यावर शनिवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास वीजपुरवठा बंद झाल्याने वायरमन पी.पे. पाटील व त्यांचे सहकारी काम करीत असतांना दुचाकीवर आलेल्या दोन जणांपैकी एकाने वायरमन पाटील यांना मारहाण केली. वायरमन पी.के.पाटील व त्यांचे सहकारी शनिवारी रात्री इदगाह रोडवर वीजपुरवठा खंडीत झाल्याने तेथे काम करीत असतांनाच त्यांना एक फोन आला व त्यांनी वीजपुरवठा का बंद आहे याची विचारणा केली, त्यांना डीपी जवळ काम सुरू असल्याची माहिती दिली. काम आटोपल्यावर वीजपुरवठा सुरू होईल, अशी माहिती दिली. यावेळी डीपीजवळ मोटरसायकलवर दोन युवक आले व त्यातील एकाने वायरमन पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण केली. वीजपुरवठा बंद झाल्याचा राग येऊन त्या युवकाने मारहाण केली. याप्रकरणी रविवारी सकाळी बाजारपेठ पोलिस ठाण्यात वायरमन पाटील व त्यांचे सहकारी तक्रार देण्यात आले होते, रात्री उशिरापर्यंत तक्रार घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. मारहाण करणार्‍यांची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी संशयीताचा शोध सुरू केला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !