यावलमध्ये गुरांची अवैध वाहतूक : वाहन जप्त ; तीन गुरांची सुटका
यावल : कत्तलीच्या इराद्याने गुरांची वाहतूक करणारे वाहन यावल पोलिसांनी जप्त करीत तीन गुरांची सुटका केली. गुरांची निमगावच्या गो शाळेत रवानगी करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातून अवैधरीत्या व अत्यंत निर्दयपणे गुरांची वाहतूक करणार्या एका वाहनास पोलिसांनी पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी गणेश मधुकर ढाकणे यांनी फिर्याद दिल्यावरून वाहन चालक शेख उमर शेख फारूख (रा.शेख पुरा, सावदा) व शेख मोसीन शेख लुकमानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे शुक्रवारी रात्री गस्तीवर असताना त्यांना एका वाहनातून बेकायदेशीरपणे विनापरवाना कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जातीच्या बैलांची फैजपूरकडून वाहतूक करताना आढळल्याने त्यांनी वाहन जप्त केले.

