डोंगरकठोर्यात डेंग्यूचा रुग्ण आढळला
यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा येथे सहावीत शिक्षण घेणार्या 12 वर्षीय विद्यार्थ्याला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष झाले असून या गंभीर बाबीची दखल घ्यावी तसेच ग्रामपंचायतीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उप केंद्रात गोळ्या-औषधींचा तुटवडा राहत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. संबंधीत अधिकारी यांनी तत्काळ गावात जनजागृती करून युद्धपातळीवर स्वच्छता अभियान राबवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांचे गावाच्या विकासाकडे व लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावात फवारणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

