नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अभ्यासक्रमावर भर


डॉ.राहुल बारजिभे : अकॅडमिक समितीच्या सभेत केले मार्गदर्शन

भुसावळ : राष्ट्रसंपत्ती निर्माण करणे हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मुख्य गाभा आहे. या मुख्य भूमिकेला अनुसरून डीबाटूने म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेने काळ सुसंगत पावले उचलली आहेत. त्यावरच अधिक भर दिला असल्याची माहिती डीबाटूचे कार्यकारी समितीचे सदस्य डॉ.राहुल बारजिभे यांनी श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात दिली. महाविद्यालयाच्या अ‍ॅकेडमिक समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डॉ.पंकज भंगाळे, डॉ.सुधीर ओझा, डॉ.गिरीश कुळकर्णी, प्रा.अविनाश पाटील, डॉ.दिनेश पाटील, प्रा.अजित चौधरी उपस्थित होते. ऑनर्स व मायनर या कार्यपद्धतीचा अवलंब करणारे डीबाटू हे देशातील पहिले तंत्रशास्त्र विद्यापीठ असणार आहे. या क्रांतीकारी निर्णयामुळेच इंजिनिअरींग विश्वाचे लक्ष डीबाटूकडे वेधले गेले आहे. इंजिनिअरींग शिक्षण बदलत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी देशातील इतर तंत्रशास्त्र विद्यापीठ तसेच इतर विद्यापीठांनी यांचे अनुकरण करण्यासारखे आहे. डीबाटूचे कुलगुरू डॉ.रामा शास्त्री यांच्या मार्गदर्शनात डीबाटू हे देशातील एक अग्रगण्य तंत्रशास्त्र विद्यापीठ होत आहे, असे डॉ.गिरीश कुळकर्णी यांनी कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात सांगितले.


शंभरहून अधिक महाविद्यालये संलग्न
जगामध्ये बहुतांश देशांमध्ये पारंपरीक विद्यापीठ सोडून वेगळी तंत्रशास्त्र विद्यापीठे आहेत किंबहुना भारतातील कित्येक राज्यांमध्ये स्वतःची तंत्रशास्त्र विद्यापीठे आहेत. महाराष्ट्र शासनाने इतर राज्यांच्या धरतीवर स्वतंत्र तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन केले. आजमितीला राज्यातील शंभराहून अधिक महाविद्यालये डीबाटू विद्यापीठाशी संलग्न आहेत. त्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या नवीन बदलांचा फायदा होणार आहे, असेही डॉ.बारजिभे यांनी यावेळी बोलताना सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !