552 नवमतदारांचे अर्ज यावलमध्ये झाले दाखल


यावल : शहरासह तालुक्यात रविवारी विशेष मतदार नोंदणी अभियान राबवण्यात आले. यात तालुक्यातील रावेर व चोपडा विधानसभा मतदार संघांतील 206 मतदान केंद्रावर 552 नवमतदारांचे अर्ज प्राप्त झाले. चोपडा मतदार संघातील 67 मतदान केंद्रावर, तसेच रावेर मतदार संघातील 139 अशा एकूण 206 मतदान केंद्रावर सकाळपासून बीएलओ उपस्थित होते. त्यांनी नवमतदारांचे अर्ज स्विकारले. चोपडा मतदार संघातून 225 तर रावेर मतदार संघातून 327 असे एकूण 552 अर्ज प्राप्त झाले. तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. तहसील कार्यालयात या सर्व अर्जांवर निवडणूक नायब तहसीलदार राहुल सोनवणे, पराग सरोदे, अनिल चौधरी, स्नेहल फिरके ऑनलाइन प्रक्रिया करत आहेत. यशस्वीतेसाठी तालुक्यातील सर्व बीएलओ परीश्रम घेत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !