लग्नाच्या आमिषातून तरुणीवर अत्याचार
यावल : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करीत तरुणीचा बळजबरीने गर्भपात केल्याप्रकरणी अट्रावलच्या एकाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीतेच्या तक्रारीनुसार, अट्रावल येथील श्रावण कैलास कोळी याने परीचय वाढवत तरुणीचा विश्वास संपादन करून लग्नाचे आमिष देत 1 सप्टेंबर 2019 ते 5 डिसेंबर 2020 दरम्यान संशयीताच्या गावातील राहत्या घरी व इतर ठिकाणी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याने तरुणी गरोदर राहिली व त्यानंतर बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपातासाठी भाग पाडण्यात आले. वर्ष उलटूनही आरोपीने लग्न केले नाही. पीडितेने लग्नासाठी आग्रह धरल्यावर श्रावण कोळीने लग्नाला नकार दिला. याप्रकरणी पीडितेने यावल पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरू आरोपी कोळीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

