भुसावळातील नाहाटा चौफुली उड्डाणपुलास महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे


बौद्ध समाज मंडळाची भुसावळ प्रांताधिकार्‍यांचे निवेदनाद्वारे मागणी

भुसावळ : भुसावळातील नाहाटा चौफुलीवरील गेलेल्या नवीन उड्डाणपुलास महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्यात यावे, अशी मागणी बौद्ध समाज मंडळातर्फे मुन्नाभाई वाल्मीक सोनवणे यांनी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे केली आहे. निवेदनाचा आशय असा की, भुसावळात महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण सुरू असून नाहाटा चौफुली या ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात आला असून या उड्डाणपुलाला घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी एकमुखी मागणी भुसावळ येथील बौद्ध समाज मंडळातर्फे करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !