शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न लागले मार्गी


भुसावळ : तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येवून शिक्षक समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या वतीने शैक्षणिक गुणवत्ते सोबतच विद्यार्थी केंद्रीत कार्यक्रमावर भर देण्यात आला. शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यावर भर देण्यात आल्याने भुसावळ तालुक्याने एक वेगळा आदर्श जिल्ह्यात निर्माण केला आहे.

समन्वय समितीने विविध समस्या काढल्या निकाली
शासकीय कर्मचार्‍यांच्या विविध संघटना आहेत. त्याच प्रमाणे शिक्षकांच्या देखील विविध संघटना आहे परंतु भुसावळ तालुक्यात सर्व संघटना एकत्र येत शिक्षक समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून विविध समस्या निकाली काढण्याचे काम या समन्वय समितीचे केले. यात शिक्षकांच्या विविध तक्रारी ऐकून तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले. प्रलंबित शिक्षकांचे वरीष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजुर करून आणले, सहावा वेतन आयोगाचा हप्ता जमा करणे, शिक्षकांना पीडीएफच्या माध्यमातून पगार पत्रके उपलब्ध करून देणे, सातव्या वेतन आयोगाची निश्‍चिती मोफत करण्यात आली, शिक्षक संघटना व शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी सांस्कृतीक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कोरोना विषाणूच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्याासाठी मोफत औषधांचे वाटप, कोरोनाच्या काळात शिक्षकांनी कोरोना काळात सेवा बजावलेल्या शिक्षकांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. राष्ट्रीयकृत बँकामधे पगार करण्यात आले व शिक्षकांसाठी स्थायीत्व प्रमाणपत्राचा प्रश्न मार्गी लावला.


या कामात यांची मिळाली मोलाची साथ
गटविकास अधिकारी विलास भाटकर, गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र फेगडे, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, बी.डी.धाडी, लिपीक चिमणकर ग. स. चे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे यांचे सहकार्य मिळाले.

समितीत यांचा समावेश
शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष प्रदीप सोनवणे, प्राथमिक शिक्षक संघाचे गजानन नारखेडे, अखिल भुसावळ तालुका शिक्षक संघाचे राजेंद्र ढाके, कास्ट्राईब शिक्षक संघाचे समाधान जाधव, अखिल महिला शिक्षक संघाचे मीरा जंगले, पदवीधर शिक्षक संघाचे विलास तायडे, शिक्षक सेनेचे प्रमोद गांधेले, शिक्षक भारतीचे अतुल पाटील, अपंग शिक्षक संघाचे नामदेव महाजन, अशोक बार्‍हे, छगन पवार, राजेंद्र सुरवाडे, मनीषा घुले, लीना अहिरे, सुधीर तायडे, निवृत्ती सूर्यवंशी, विनय भोगे, रवींद्र पोळ, महेंद्र पाटील, सुर्यकांत घुले, कमलेश श्यामकुवर, रूपेश मेश्राम.

एकीमुळे शक्य झाले
तालुका शिक्षक संघटनेेचे पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी तसेच सर्व संघटनांच्या समन्वयातून काम करण्याची संधी उपलब्ध झाली. एकीच्या बळाचा फायदा सर्वसामान्य शिक्षक बांधवांच्या समस्या सोडविण्याकामी आला. जिल्ह्यात प्रथमच शिक्षक बांधवांसाठी शिक्षण विभागाच्या मदतीने सांस्कृतीक व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करता आले असल्याची माहिती
शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी दिली.

मोफत शिबिराचे आयोजन
शिक्षक समन्वय समिती व योगेश इंगळे मित्र परीवारातर्फे तालुक्यातील शिक्षक बांधवासाठी जिल्ह्यात प्रथमच मोफत वेतन निश्चिती शिबिराचे आयोजन करून प्रिंटसह वेतन निश्चिती करून दिल्याने पैशासह शिक्षकांच्या वेळेचे देखील बचत झाल्याचे अखिल शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र ढाके म्हणाले.

राष्ट्रीयकृत बँकेत पगार खाते वर्ग
राष्ट्रीयकृत बँकेत पगाराचे खाते झाले. वर्ग शिक्षक समन्वय समितीमुळे तालुक्यातील शिक्षक बांधवाना आयकर व रीटर्नची कामे करणे सुलभ झाले.सर्व संघटनांमध्ये एकवाक्यता आल्यामुळे शिक्षक बांधवांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते वर्ग करता आले. यामुळे राष्ट्रीयकृत बँकेचे लाभ शिक्षकांना मिळत असल्याचे कॉस्ट्राईब शिक्षक संघाचे अध्यक्ष समाधान जाधव म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !