अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे सात ट्रॅक्टरसह वाळू साठ्यावर कारवाई
रावेरात महसूल प्रशासनाची नोव्हेंबर महिन्याची कामगिरी
रावेर : रावेर तालुक्यात होणार्या अवैध वाळूवर तहसील प्रशासनाकडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली. महसूल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार गत महिन्यात 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान तालुक्यात सात अवैध वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टर-टॉली वर महसूलच्या पथकाने धडाकेबाज कारवाई केली. रवींद्र कोळी, आसीफ तडवी, मिलिंद भंगाळे यांचे विना नंबर अवैध वाळूचे ट्रॅक्टर-टॉली पकडण्यात आली तसेच राजेंद्र कोळी यांचे ट्रॅक्टर (एम.एच.0835), रीतेश धनगर (एम.एच.19 टी.4802), आत्माराम महाजन (एम.एच.19 पी.3821) यांच्यासह सात अवैध टॅक्टर-टॉली वर महसूल पथकाने कारवाई करून दंड वसूलीसाठी नोटीस पाठवण्यात येणार आहे तसेच निंभोरासीमनजीक अवैधरीत्या साठवण्यात आलेल्या 500 ब्रासचा वाळूसाठा जप्त करण्यात आला.

