रेल्वेखाली आल्याने अनोळखी वृद्धेचा मृत्यू
भुसावळ : बोदवड रेल्वे स्थानकाजवळ डाऊन 00113 कोविड पार्सल गाडीखाली आल्याने 75 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. 13 डिसेंबर रोजी ही घटना घडली. या प्रकरणी ऑन ड्युटी स्टेशन उपप्रबंधकांनी दिलेल्या खबरीनुसार भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनोळखी वृद्धेची उंची 4 बाय 3 फूट, रंग सावळा, नक सरळ, शरीर बांधा सडपातळ, डोक्याचे केस पांढरे तसेच अंगावर हिरव्या रंगाची साडी तसेच तपकिरी रंगाचे ब्लाऊज असे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्गचे एएसआय अनंत रेणुके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

