अप ताप्ती गंगा एक्स्प्रेसमधून मोबाईल लांबवला
भुसावळ : प्रवासी झोपल्याची संधी साधून चोरट्यांनी अप ताप्ती गंगा एक्स्प्रेसमधून दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. मंगळवार, 15 रोजी पहाटे ही घटना घडली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अप ताप्ती गंगा एक्स्प्रेसमधून उदयकुमार वासू प्रसाद (रा.गंगा नगर, जि.जहानाबाद) हे डी वन या डब्यातील बर्थ क्रमांक 68 वर बसून पटना ते सूरत प्रवास करीत असतांना जबलपूर ते पिंपरीयादरम्यान त्यांना झोपल्याने अज्ञात चोरटयांनी पहाटे एक ते पावणेदोन दरम्यान मोबाईल लांबवला. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात उदयकुमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा शून्य क्रमांकाने पिंपरीया जीआरपी पोलिस ठाण्याकडे वर्ग करणात आला.

