त्यांनी आता आत्मचिंतन करावे ; नाथाभाऊंचा फडणविसांना नाव न घेता टोला

बोदवडच्या निकालावर खडसे म्हणाले ; सेना-भाजपाने केली छुपी युती


भुसावळ : राज्यातील 366 नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मिळवलेल्या यशानंतर राष्ट्रवादी (ncp) हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरला असतानाच माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (eknathrav khadse) यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ न्यूज पोर्टलशी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांचे नाव न घेता टिकेचे बाण चालवले आहेत. ते म्हणाले की, राष्ट्रवादीला गल्लीतला पक्ष म्हणवणार्‍यांनी खरे तर या निकालातून आता आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे.

बोदवडच्या निकालावर म्हणाले ; हा तर निसटता पराभव
बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत (bodwad nagar panchayat election) आमचा निसटता पराभव झाला असला तरी पराभव हा पराभव असतोच, असे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे (eknathrav khadse) म्हणाले. एक जागा ईश्वरचिठ्ठीमुळे गेली दुसरी जागा सहा तर तिसरी जागा दहा मतांनी हुकली मात्र शिवसेना व भाजपाची छुपी युती असतानाही आम्ही मिळवलेल्या यशाचे समाधान आहे. माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे यांचा या निवडणुकीत पराभव झाला असल्याचेही माजी मंत्री खडसे (eknathrav khadse) यांनी स्पष्ट करीत राज्यात मात्र आमचाच पक्ष क्रमांक एकचा ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.


राष्ट्रवादीच्या पराभवासाठी सार्‍यांची एकजूट
बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वांनी मिळून राषट्रवादीचा पराभव कसा होईल यावर ताकद खर्ची केल्याचे माजी मंत्री खडसे (eknathrav khadse) म्हणाले. बोदवड नगरपंचायत ही राष्ट्रवादीकडे नसतांना आम्ही चांगले प्रयत्न केले. येथे शिवसेना व भाजपची छुपी युती असतांनाही आम्हाला दहा जागा मिळतील, असे वाटत होते मात्र तसे झाले नाही. एक जागेवर ईश्वरचिठ्ठीने भाजपा उमेदवार विजयी झाला तर काही जागांवर ठरावीक मतांनी आमचे उमेदवार पराभूत झाल्याचेही नाथाभाऊंनी (eknathrav khadse) सांगितले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !