कंडारीच्या विवाहितेची आत्महत्या : आरोपीचा जामीन नामंजूर
भुसावळ : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी अटकेतील आरोपी पतीचा दुसर्यांदा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
दुसर्यांदा फेटाळला जामीन
दोन वेळा मुलीच झाल्यानंतर मुलगाच हवा म्हणून तालुक्यातील कंडारी येथील विवावहितेचा छळ करून मारहाण करण्यात आली. या छळाला कंटाळून विवाहिता मनीषा तायडे (25) यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचारी तथा पती गौरव भीमराव तायडे व सासुविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी पती गौरव याने दुसर्यांदा या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. फिर्यादीतर्फे अॅड.कृष्णा आर.सिंग यंनी काम पाहिले. त्यांना अॅड.धनराज मगर यांनी मार्गदर्शन केले तर सरकारतर्फे अॅड.देशपांडे यांनी युक्तीवाद केला.
-
थकबाकीदार शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडित करणार नाही : उर्जामंत्र्यांची मोठी घोषणा
-
पाच हजारांची लाच गटविकास अधिकार्याला भोवली : कार्यालयातच केली एसीबीने रंगेहाथ अटक


