अखेरच्या क्षणी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचे मंत्री पदी नाव निश्चित


मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षेबाबत (टीईटी) झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपानंतर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्री पद मिळणार नसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली मात्र अखेरच्या क्षणी त्यांचे नाव निश्चित करण्यात आले. सत्तार यांनी शपथ घेताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

या कारणास्तव वाढली होती अडचण
शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र असताना, बनावट प्रमाणपत्र वितरित झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या यादीत माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे आल्याने खळबळ उडाली होती. परिषदेने ’टीईटी’त गैरप्रकार केलेल्या 7,880 उमेदवारांची यादी जाहीर केली. अपात्र घोषित करीत उमेदवारांना टीईटी 2019 मधील संपादणूक रद्द करून यापुढे होणार्‍या परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले. यामध्ये 7,500 उमेदवारांच्या गुणांमध्ये फेरफार करून अपात्र असतानाही निकालात त्यांना पात्र करण्यात आले. तर 293 उमेदवार असे आहेत जे अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना परिषदेच्या विहित पद्धतीने प्रमाणपत्र वितरित झालेले नाहीत. त्यांनी बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलेले आहे अथवा प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या यादीत सत्तार यांच्या मुलींची नावे असल्याची चर्चा समोर आली. त्यामुळे खळबळ उडाली होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !