Power struggle in the state: Hearing to be held on August 22 राज्यातील सत्ता संघर्ष : 22 ऑगस्टला होणार सुनावणी


Power struggle in the state: Hearing to be held on August 22 मुंबई : राज्यात वाढलेल्या संघर्षानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर नेमका काय निकाल लागणार याकडे उत्सुकता लागली असताना या प्रकरणात तारीख पे तारीख प्रकरण पुढे ढकलले जात असताना दिसून येत आहे. अलिकडेच शिंदे सरकारने मंत्री मंडळ विस्तार केला असून दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणी आता 22 ऑगस्टला होणार आहे.

12 रोजी ऐवजी आता 22 ला सुनावणी
उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांनी एकमेकांवर विविध याचिका दाखल केल्या असून याची सुप्रीम कोर्टात एकत्रीत सुनावणी सुरू आहे. आधी ही सुनावणी 12 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. यानंतर आज ही सुनावणी 22 ऑगस्टपर्यंत लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे.

सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर
दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेनेला पक्षावर ताबा दाखविण्यासाठी पुरावे सादर करण्यासाठी आजच चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे. तथापि, सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याचे आता दिसून येत आहे.

निकालाकडे लागले राज्याचे लक्ष
सरन्यायाधीश रमण्णा हे 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्याजागी उदय लळित हे सरन्यायधीशपदाची जबाबदारी स्विकारत आहेत. त्यामुळे, आता शिंदे विरुद्ध शिवसेना यांच्यातील न्यायालयीन लढाई रमण्णा यांच्या कोर्टात संपुष्टात येते की लळित यांच्यापर्यंत पोहोचते हे पहावे लागणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !