भुसावळात ऐतिहासिक तपोत्सव समारोह
एकाचवेळी तीन मासखमण, उपवासाची पचकावणी
भुसावळ : शहरातील श्री जैन श्वेतांबर तेरापंथ सभातर्फे बुधवारी सकाळी 9.30 वाजता ऐतिहासिक मासखमण तपस्येची पचकावणी झाली. महातपस्वी महामनस्वी शांतीदूर आचार्य श्री महाश्रमणजी यांचे सुशिष्य मुनीश्री आलोककुमारजी आदी ठाणा-3 यांच्या प्रमुख उपस्थितीत आरती सांखला, ममता जैन, धीरज रुणवाल यांच्या मासखमण तपस्येची पचकावणी झाली तसेच अनोप सेठीया, साधना बेदमुथा व जय निमाणी यांच्या अनुक्रमे 11, 9 व 6 उपवासाची पचकाणी उत्साहात झाली.
जैन मुनींनी सांगितले तपस्येचे महत्व
श्री जैन तेरापंथ सभेच्या भुसावळ शहरातील इतिहासात एकाच वेळी तीन मासखमण तपोत्सवाचा प्रत्याखानानचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सकाळी 9.30 वाजता मातृभूमी चौकातील तेरापंथ भवनात हा कार्यक्रम झाला. प्रसंगी आमदार संजय सावकारे यांनी उपस्थित राहून तपस्वींचे अभिनंदन केले. प्रसंगी मुनीश्री हिमकुमार यांनी गीतीकेच्या माध्यमातून भावना व्यक्त केली. लक्ष्य कुमारजी यांनी तपस्वींसाठी मंगल कामना केली. सूत्रसंचालन अनिता सांखला यांनी केले. तेरापंथ सभा, महिला मंडळ व युवक परीषद सभासदांनी परीश्रम घेतले.

