Shirpur Police turned the bulldozer of action on ganja Cultivation : Plants Worth 14 Lakhs Seized गांजा शेतीवर शिरपूर पोलिसांनी फिरवला कारवाईचा बुलडोजर : 14 लाखांची झाडे जप्त


Shirpur Police turned the bulldozer of action on ganja Cultivation : Plants Worth 14 Lakhs Seized शिरपूर : अल्पावधीत श्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतात चक्क गांज्याची शेती फुलवण्यात आली मात्र शिरपूर तालुका पोलिसांना त्याबाबतची कुणकुण लागताच पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अचानक छापा टाकत एकाच्या मुसक्या आवळत 14 लाखांची गांज्याची झाडे जप्त केली. शिरपूर तालुक्यातील सांज्यापाडा फत्तेपूर येथे ही कारवाई करण्यात आली. जामसिंग जसमल पावरा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना गांज्याच्या शेतीाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यासह प्रादेशिक परीवहन अधिकारी सुनील पाटील व पथकाने बुधवारी सायंकाळी सांज्यापाडा फत्तेपूर येथील शेतात कारवाई करीत 14 लाख 46 हजार 600 रुपये किंमतीचे एकूण 482 किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थाची झाडे जप्त केली तसेच आरोपी जामसिंग पावरा याला अटक करण्यात आली. आरोपीविरोधात शिरपूर तालुका पोलिसात एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय संदीप पाटील करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ, संदीप पाटील, भिकाजी पाटील, के.एस.जाधव, संजय सूर्यवंशी, चतरसिंग खसावद, पवन गवळी, जगदीश मोरे, प्रवीण धनगर, संदीप ठाकरे, आरीफ पठाण, संदीप शिंदे, भूषण चौधरी, अनिल शिरसाठ, मोहन पाटील, जयेश मोरे, योगेश मोरे, प्रकाश भील, रोहिदास पावरा, कृष्णा पावरा, संतोष पाटील, इसरार फारुकी व आरसीपी पथकाने केली.

 


कॉपी करू नका.