फैजपूरात शेतीचा ताबा मिळण्यासाठी शेतकर्‍यांचे बेमुदत उपोषण सुरू


फैजपूर : फैजपूर उपविभागीय कार्यालयासमोर यावलसह रावेर तालुक्यातील सावकारग्रस्त शेतकर्‍यांनी शेतीचा ताबा मिळणच्या मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत उपोषण छेडले आहे. सावकारग्रस्त शेतकर्‍यांनी फैजपूर उपविभागीय कार्यालयास उपोषणाबाबत 16 जानेवारी निवेदन दिले मात्र त्यानंतरही दखल घेण्यात न आल्याने आता मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

आदेशामुळे वाढला पेच
अवैध सावकारी धंद्यातून कर्जास गहाण कारण व अटकाव म्हणून नाममात्र खरेदीखताद्वारे लिहून घेतलेली शेती हडप केल्याबाबत सहकार विभागाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्यानंतर अवैध सावकारी व्यवहारामुळे आदेश पारीत करण्यात आला व गहाण म्हणून घेतलेल्या खरेदी खताचे सर्व दस्तऐवज घोषित करून रद्द करण्यात आले तसेच महसूल नोंदी रद्द करून शेती मूळ मालकाच्या नावाने करण्याचे आदेशही काढण्यात आले. महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 हा विशेष कायदा असून या कायद्यानुसार देण्यात आलेल्या आदेशाचे पालन करणे हे महसूल विभागाचे कर्मचारी यांचे शासकीय कर्तव्य आहे. मंडळ अधिकारी, तलाठ्यांवर तहसीलदार हे सावकारांच्या दबावाखाली काम करीत असून आम्हाला न्याय मिळण्यापासून वंचित ठेवत आहे, शेतीी ताबा पावती मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार 12 उपोषणार्थींनी व्यक्त केला आहे.







यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
या निवेदनावर पुंडलिक नथू चौधरी, निलेश धनसिंग पाटील, निलेश रमेश चौधरी, सुनील अर्जुन जावळे, श्रीकृष्ण दामू पाटील, सोपान शामराव पाटील, राजेंद्र भास्कर पाटील, रवींद्र भागवत जावळे, दिलीप रवीराम पाटील, उषाबाई टोपा जंगले, आशाबाई रवींद्र पाटील, सीमाबाई चंद्रकुमार फेगडे, भारती अनिल परदेशी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. उपोषणार्थींची वैद्यकीय तपासणी डॉ.कौस्तुभ तळेले (न्हावी), नयन दांडगे, रीतेश ठाकरे, नवीन कोळी आदींनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !