उंटाच्या कत्तलीपूर्वीच वरणगावात पोलिसांची धाडसी कारवाई : 11 उंटांची सुटका ; मध्यप्रदेशातील त्रिकूट जाळ्यात


Brave action of police in Warangaon before camel slaughter: 11 camels rescued; In the triad network in Madhya Pradesh भुसावळ :  भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलिसांनी कत्तलीच्या इराद्याने वाहतूक होत असलेल्या 11 उंटांची सुटका करीत मध्यप्रदेशातील त्रिकूटाच्या मुसक्या बांधल्या. बुधवारी रात्री 10.30 वाजता हतनूर तापी नदीपात्रानजीक नाकाबंदीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, संशयित 12 उंट हे कत्तलीच्या उद्देशाने मध्यप्रदेशातून मालेगाव येथे नेत असल्याची माहिती समोर आली असून निर्दयतेने झालेल्या वाहतुकीमुळे एका उंटाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

नाकाबंदीदरम्यान रोखली उंटाची कत्तली
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात सर्वत्र अप्रिय घटना टाळण्याच्या अनुषंगाने नाकाबंदीच्या सूचना करण्यात आल्या असून वरणगावचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हतनूर तापी नदीपात्रानजीक नाकाबंदी केल्यानंतर बुधवार, 21 जून रोजी रात्री 10.30 वाजता विटकरी रंगाचा टेम्पो (सी.जी.04 एन.एस.2005) आल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात उंटाची अत्यंत निर्दयतेने व क्रुरतेने वाहतूक होत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी वाहनासह तिघांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. यावेळी वाहनातील एका उंटाचा निदर्यतेने झालेल्या वाहतुकीमुळे मृत्यू झाल्याचे दिसून आले तर अन्य 11 उंटांची सुटका करण्यात आली.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
उंटाची कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयतेने व क्रुरतेने वाहतूक केल्याप्रकरणी वरणगावचे हवालदार प्रवीण युवराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित संतोषकुमार भगीरथ वर्मा (50, पडाना, सारंगपूर, जि.राजगढ, मध्यप्रदेश), मुकेश गुरूमुख नायर (50, कुमटी, हसलपूर, इंदौर, मध्यप्रदेश) व कार्तिक कैलास वर्मा (25, गिंदोरी, राजगढ, बांसखेडा, मध्यप्रदेश) यांच्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !