दिल्लीतील आचार्यास भुसावळात ब्लेड मारून लुटले : आरोपीला अखेड बेड्या
Achari in Delhi robbed with a blade in Bhusawal : Accused in chains भुसावळ : शहरातील जुन्या नगरपालिकेजवळ दिल्ली येथील रहिवासी असलेल्या आचार्याला हनुवटीजवळ ब्लेड मारून लुटण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री जुन्या नगरपालिका कार्यालयाजवळ घडली होती. या प्रकरणी गणेश तेगबहाद्दूर थापा (31, जय कॉलनी, लॉरेन्स रोड, शकूरपूर, दिल्ली) यांच्या तक्रारीनंतर आरोपी सोनू मोसम औसरमल (भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास रविवारी अटक करण्यात आली. संशयिताला भुसावळ न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ब्लेड मारून केली होती लूट
दरम्यान, थापा हे पालिकेच्या जुन्या पालिकेजवळ शनिवारी रात्री 11 वाजता उभे असताना संशयित औसरमल याने धक्काबुक्की करीत शिविगाळ केली तसेच ब्लेडने हनुवटीवार वार करीत जखमी करून तीन हजारांची रोकड जबरीने लुटून पोबारा केला होता. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयिताला अटक केली. तपास सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे करीत आहेत.



