भोटातील तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह
The body of a young man from Bhota was found in a well मुक्ताईनगर : तालुक्यातील भोटा येथील 40 वर्षीय तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विक्रम उर्फ तोत्या उत्तम तायडे (40, भोटा, ता.बर्हाणपूर) असे मयताचे नाव आहे.
तायडे यांनी आत्महत्या केली की अन्य कारणाने त्यांचा मृत्यू झाला? याबाबतच्या कारणांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. तपास पोलीस नाईक गजमल पाटील करीत आहेत.