टाकळी शेत शिवारातून 20 हजारांचे शेती साहित्य लांबवले


मुक्ताईनगर : टाकळी शेत शिवारातून चोरट्याने 20 हजार रुपये किंमतीचे शेती-साहित्य लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी एकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयिताविरोधात गुन्हा दाखल
संतोष श्रीराम चव्हाण (52, टाकळी) यांचे टाकळी शिवारात गट क्रमांक 12/2 मध्ये शेत आहे. 29 ते 30 जूनदरम्यान संशयित बाळू ममराज जाधव (टाकळी) याने शेतातून 15 हजार रुपये किंमतीचे ठिबक नळ्या व पाच हजार रुपये किंमतीचे सुप्रीम कंपनीचे पाईप असे एकूण 20 हजारांचे साहित्य चोरून नेल्याचा आरोप शेतकर्‍याने केल्याने संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक विनोद सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !