राज्यात टोलचा झोल ; टोलनाके जाळण्याचा मनसेप्रमुख राज ठाकरेंचा इशारा


Toll in the state; MNS chief Raj Thackeray warns of burning toll booths मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील टोलनाक्यांवर होणार्‍या लूटबाबत पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत त्यांनी अजित पवारांपासून उद्धव ठाकरे, फडणवीस आणि गोपीनाथ मुंडेंना देखील सोडलेले नाही. त्याच त्याच कंपन्यांना कंत्राटं कशी मिळतात? असा सवाल त्यांनी करीत आता सरकारला दोन दिवसात जाब विचारणार असल्याचे सांगितले आहे शिवाय फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे कार, रीक्षा, टू व्हीलर याां टोल माफी असेल तर मनसेचे सैनिक प्रत्येक टोलवर उभे राहून हा टोल आकारू देणार नाहीत. जर नाही झाले तर आम्ही सर्व टोलनाके जाळून टाकू, असा गंभीर इशारा दिल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

पत्रपरीषदेत लावले भाषण
राज ठाकरेंनी सोमवारी पुन्हा एकदा टोलविरोधी अस्त्र उगारत अजित पवारांचे टोलमुक्तीचे भाषण, मनसेने आंदोलन उभारल्यानंतर उद्धव ठाकरेंची घोषणा आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे टोल माफी देण्याचे भाषण पत्रकार परीषदेत दाखविले. याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे ही दोन व्हिडीओ दाखवले.

यामध्ये फडणवीस यांनी राज्यात टोलमाफी देण्यात आली असून फक्त मोठ्या कमर्शिअल गाड्यांनाच टोल आकारला जात आहे, असे सांगितले होते. हे खरे आहे का? तुम्हाला कार घेऊन जात असताना टोल भरावा लागत नाहीय का? फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे कार, रीक्षा, टू व्हीलरना टोल माफी असेल तर मनसेचे सैनिक प्रत्येक टोलवर उभे राहून हा टोल आकारू देणार नाहीत. जर नाही झाले तर आम्ही सर्व टोलनाके जाळून टाकू, असा गंभीर इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. तुम्ही माघार का घेतली? आताच्या सरकारवर दबाव आहे का? कोणाच्या उत्पन्नाचे साधन आहे का? याची उत्तरे मला पुढील दोन-तीन दिवसांत मिळतील. हे पैसे राज्य सरकारने घेतलेत का? जर घेतले असतील तर लोकांना चांगले रस्ते का मिळत नाहीत, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !