रिव्हेंज : भुसावळात पूर्व वैमनस्यातून तरुणाचा गोळ्या झाडून खून
चार संशयीतांनी भल्या सकाळी चहाच्या दुकानात केली फायरिंग : शहरात खुनामुळे खळबळ
Revenge : Youth shot dead in Bhusawal over past enmity भुसावळ (10 जानेवारी 2025) : बदले की आग या ट्रेण्डमधून भुसावळातील 27 वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता भुसावळातील खडका रोडवरील अमरदीप टॉकीज जवळील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात घडली. तेहरीन नासीर शेख (27, मचछीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
काय घडले नेमके ?
जाम मोहल्ला भागातील आर.के.किताब घरासमोरील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात तेहरीन नासीर शेख (27, मच्छीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) हा चहा पिण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता आल्यानंतर दोन दुचाकीवर तोंडाला रूमाल बांधून आलेल्या चार संशयीतांपैकी तिघांनी आपल्याकडील गावठी पिस्टलातून पाच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने दुकानातील ग्राहकांमध्ये पळापळ झाली तर काही क्षणात संशयीत दुचाकीवरून पसार झाले.
पोलिसांची धाव
शरीरातील विविध भागात गोळ्या लागल्याने तेहरीनचा जागीच मृत्यू झाला तर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्यांनी धाव घेतली. चार संशयीतांचा कसून शोध सुरू आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.