भुसावळातील आपले परिवार सार्वजनिक वाचनालयात हर घर संविधान उपक्रम

भुसावळ (25 जानेवारी 2025) : वांजोळा रोडवरील आपले परिवार सार्वजनिक वाचनालयात 1 ते 30 जानेवारी दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांतर्गत गुरुवार, 23 रोजी दुपारी तीन वाजता तु.स.झोपे गुरुजी प्राथमिक शाळा, हनुमान नगरातील विद्यार्थी व शिक्षकांनी वाचनालय परिसरात येऊन वाचनालय कामकाजाचे स्वरूप समजून घेतले.
त्यात मुक्तद्वार वाचन विभाग, पुस्तक देव देव, बालकुमार साहित्य दालन, संत साहित्य व दैनिक वृत्तपत्र कात्रण संग्रह,. वाचन संस्कृती अभियान याबाबत माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी केंद्रप्रमुख दिनकर जावळे होते. व्यासपीठावर उदय बोंडे, मुख्याध्यापक वीरभान पाटील, सुनील वानखेडे, पर्यवेक्षक सुरेश बाविस्कर, पी.एन.राणे, बी.ए.पाटील, रामचंद्र ढाके, आनंद सपकाळे, डॉ.पंकज राणे, जगन्नाथ इंगळे, पाटील, सुरेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यापर्न विरभान पाटील यांनी केले.
यावेळी बी.ए.पाटील, जीवनदान ब्लड ग्रुपचे सतीश महाजन (खडका), भुसावळ मुख्य पोस्ट ऑफिसचे राहुल तळेले, भुसावळ ते शेगाव पायीवारी पालखी नेणारे श्री गजानन ग्रुपचे एकनाथ राणे व सहकारी, तु.स.झोपे गुरुजी प्राथमिक शाळा हनुमान नगरचे शिक्षक सिद्धार्थ भालेराव, रत्नाकर फेगडे, रुचिता बोंडे, नरेश मुर्हेकर, बी.ई.उच्चशिक्षित राधाकृष्ण लॉन्सचा व्यवसाय सांभाळणारे वैभव ढाके आदींना संविधान उद्देशिका प्रत व हरिपाठ निरूपण हे पुस्तक उपरणे देऊन सन्मानित करण्यात आले.
