दुध महागले : विकास दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपये वाढ


जळगाव : भुसावळसह जळगावच्या ग्राहकांना विकासच्या दुधासाठी आता प्रति लिटर दोन रुपये जादा मोजावे लागणार आहे. जळगाव जिल्हा दूध संघाने केलेली दूध दरवाढ रविवार 25 ऑगस्टपासून लागू झाली आहे. त्यात सर्वच प्रकारच्या दुधाच्या विक्री दरात लिटरला 2 रूपये वाढ झाली आहे. त्यामुळे विकास फुल क्रिम मिल्क (गोल्ड दूध) 54 रुपये, विकास प्रमाणीत दूध 42 रुपये, विकास स्मार्ट (गायीचे दूध) 40 रुपये, विकास टोण्ड (ताजा) दूध 38 रुपये, विकास टोण्ड 45 रुपये व विकास स्मार्ट (गाय) 1000 मिली 39 रुपये प्रतिलिटर दराने आता विक्री होणार आहे.


कॉपी करू नका.