महाराष्ट्रातील दोन बसेसला गुजरातमध्ये अपघातानंतर आग : सात प्रवाशांचा मृत्यू

बारडोली तालुक्यात भीषण अपघात : मृतांचा आकडा वाढण्याची भीती


Two Buses from Maharashtra Catch Fire After Accident in Gujarat: Seven Passengers Dead सुरत (2 जून 2026) : महामार्गावर टँकर उलटल्याने धडक टाळण्यासाठी चालकाने बस वळवल्यानंतर नियंत्रण सुटल्याने दोन बसेसमध्ये धडक होवून बस लागल्याने सात प्रवाशांचा मृत्यू झाला. सीएनजीवरील बस असल्याने तत्काळ आगीने पेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितला. हा भीषण अपघात गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा-माणिकपोर गावाजवळ मंगळवारी दुपारी घडला. अपघातातील मृत्यूंचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

असा घडला अपघात
बारडोलीच्या उवा गावाजवळ महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या एम.एच.18 बी.झेड. 1258 आणि एम.एच. 20 बी.एल.3390 या दोन बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात सातपेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक भीती व्यक्त होत आहे. रस्त्यावर उलटलेल्या एका टँकरला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. एक बस सीएनजीवर चालणारी असल्याने धडकेनंतर काही वेळातच तिला आग लागल्याचे सूत्रांनी सांगितले..

सीएनजीमुळे बसचा कोळसा
ही समोरासमोरची धडक इतकी भीषण होती की, दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले. एका बसचा समोरचा भागाचा चेंदामेंदा झाला असून, दुसरी बस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. रस्त्यावरून खाली गेलेली बस सीएनजीवर चालणारी होती. धडक बसताच इंधनाची गळती होऊन बसला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळांमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता.

या गंभीर अपघातात आगीमुळे भाजल्याने अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !