तत्परतेने काम करीत जनतेला न्याय देणार्या नायब तहसीलदारांनी सोडला पदभार
तहसीलदारांसह कार्यालयातील कर्मचार्यांनी संजय तायडेंचा केला सन्मान
रावेर : सेवा हीच ओळख मानून काम करणार्या रावेरचे निवासी नायब तहसीलदार यांची भुसावळ तहसील कार्यालयात काही दिवसांपूर्वीच बदली झाली होती. काम घेवून येणार्या जनतेला समाधान वाटेल अशाच पद्धत्तीने काम करण्याचा प्रघात तायडे यांचा असल्याने अल्पावधीत ते रावेर तालुकावासीयांच्या गळ्यात ताईत ठरले होते. शुक्रवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्यासह अधिकारी व कर्मचार्यांच्या उपस्थितीत त्यांना प्रेमाचा निरोप देण्यात आला.
गौण खनिज धारकांवर ओढला कारवाईचा आसूड
पद रावेर महसूल विभागात निवासी नायब तहसीलदार म्हणून तायडे यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्या व त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने वरीष्ठांच्या आदेशावरुन निवडणुका पार पडला. याच कामाची दखल घेऊन प्रशासनाने संजय तायडे यांना प्रशस्तीतपत्र देऊन सन्मानीत केले शिवाय विभागातून सन्मानीत होते ते एकमेव नायब तहसीलदारही ठरले. सुमारे पाच वर्षानंतर 2019 मध्ये रावेर महसूलची शंभर टक्के वसूली झाली. यातदेखील त्यांचा मोलाचा वाटा राहिला. अवैध गौण खनिजाची वाहतूक करणार्यांवर त्यांनी कारवाईचा आसूड ओढत शासनाला महसूल वसूल करून दिला. सकाळी दहा वाजेपासून महसूल कार्यालयात आल्यानंतर वरीष्ठ अधिकारी घरी गेल्या नंतरच घरी जाण्याचा त्यांनी प्रघात कायम ठेवला.

अनेकांना दिला मदतीचा हात
रस्त्याने कोणी गरीब-असहकाय दिसल्यानंतर तायडे यांनी त्यास मदत केली नाही तर नवल ! कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक गरीब कुटुंबांना स्वखर्चातून त्यांनी आर्थिक मदत देत त्यांना दिलासा दिला. भुसावळ येथून रावेरला कार्यालयात येतांना कोरोना काळात पायी घर गाठणार्या लोकांना संजय तायडे यांनी चप्पला व बिस्किट वाटप करत मानवतेचा धर्म निभवला. शासकीय काम अन् बारा महिने थांब हा सर्वसामान्यांना आलेला अनुभव असलातरी तायडे याला मात्र अपवाद ठरले. संजय तायडे म्हणाले की, मला रावेर येथे शासनाची शंभर टक्के वसुली करण्यात जास्त समाधान वाटले. मित्रांचे प्रेम व जनतेच्या केलेल्या कामांच्या आशीर्वादामुळे भुसावळातदेखील यापेक्षा चांगले काम करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त करीत रावेरकरांच्या प्रेमाबद्दल ऋणी असल्याचे त्यांनी नम्रपणे नमूद केले.

