आजाराला कंटाळून पिंप्रीसेकमच्या वृद्धाची आत्महत्या
भुसावळ : दम्याच्या आजाराला कंटाळून पिंप्रीसेकम येथील 60 वर्षीय वृद्धाने शेतात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तालुका पोलीस स्टेशनला या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नथू तुळशीराम झाल्टे (60, रा. पिंप्रीसेकम) असे मयताचे नाव आहे. त्यांना गेल्या अनेक वर्षापासून दम्याचा आजार होता तसेच मद्याचे व्यसनही होते. . दम्याच्या आजाराला कंटाळून त्यांनी कडू बदामच्या झाडाला गळफास घेतला. मयताचा मुलगा काशीनाथ झाल्टे यांनी तालुका पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

