मिरजेत तरुणाचा गळा चिरून खून


मिरज : 40 वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड टाकून त्याचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना मिरजेतील रेल्वे कर्मचारी वसाहतीजवळ समतानगर येथे रविवारी मध्यरात्री घडली. या घटनेत गोविंदा मुत्तीकोळ (वय 40) या तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. मृत तरुणाची आई निवृत्त रेल्वे कर्मचारी असून मयत गोविंदा हा आईसह समतानगरात वास्तव्यास होता. रविवारी मध्यरात्री तीन वाजता समतानगर येथे जुन्या हरिपूर रस्त्यावर दोन ते तीन हल्लेखोरांनी निर्घृणपणे गोविंदाचा खून केल्याचे सांगण्यात आले. गोविंदा याच्यासोबत रात्री असलेल्या अंमली पदार्थाच्या व्यसनी मित्रांसोबत भांडण झाल्याने त्याचा खून करण्यांत आल्याचा संशय आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !