भुसावळात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


भुसावळ : घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाणदिनानिमित्त भुसावळ शहर काँग्रेस अनु.जाती विभागाद्वारे अभिवादन करण्यात आले. भुसावळ पालिकेच्या जुन्या कार्यालयासमोरील महामानव डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पदाधिकार्‍यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, उपाध्यक्ष ईस्माईल गवळी, अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार, कुणाल सुरळकर, राहुल कडेरे, गोलू बगाडे, गोलू इंगोले, भिमराव सपकाळे, विश्वनाथ गायकवाड, वेणूबाई तायडे, कल्पना इंगळे, अनिता सावळे, मयुर साळवे आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !