सावदा नगरसेवक राजेंद्र चौधरी अपात्र
जिल्हाधिकार्यांचे आदेश : पत्नी नगराध्यक्षा असताना पदाचा केला दुरूपयोग
सावदा : पत्नी नगराध्यक्ष पदावर असताना पदाचा दुरुपयोग करून वाढीव घरपट्टी लागू असतानाही स्वतःची घरपट्टी कमी लागू करून नगरपरीषद व शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी सावदा पालिकेचे नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांना जळगाव जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी सोमवारी अपात्र ठरवल्याने खळबळ उडाली आहे. चौधरी यांच्या संदर्भात सावद्यातील अजय भागवत भारंबे यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती.
तक्रार भोवली : नगरसेवक अपात्र
सन 2006 ते 2011 या कालखंडात नगरसेवक चौधरी यांच्या पत्नी हेमांगी राजेंद्र चौधरी या नगराध्यक्षा होत्या. त्यावेळी पदाचा दुरुपयोग करीत वाढीव घरपट्टी लागू असताना ही स्वतःसाठी मात्र कमी घरपट्टी लागू करीत नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अपात्रतेचा अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल अजय भारंबे यांनी दाखल केला होता. दोन्ही बाजूचा युक्तीवाद व पुराव्यांची शहानिशा केल्यानंतर तक्रारदार यांचा अर्ज मंजूर करीत सावदा येथील नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरवले आहे.


