अल्पवयीन मुलीची छेडखानी : आरोपीला तीन वर्ष शिक्षा


भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल

भुसावळ : आई-वडील घरी नसल्याची संधी साधून अल्पवयीन मुलीची छेडखानी केल्याची घटना बोदवड तालुक्यात घडली होती. या प्रकरणी एकनाथ चावदस मोरे (कोल्हाडी) या आरोपीविरुद्ध बोदवड गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज भुसावळातील दुसरे अतिरीक्त सत्र न्यायाधीश एस.बी.भन्साली यांच्या न्यायासनापुढे चालले. आरोपीविरुद्ध खटला सिद्ध झाल्याने त्यास तीन वर्ष सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

आरोपीला दंड व शिक्षा
सन 2016 मध्ये आरोपी एकनाथ चावदस मोरे याने अल्पवयीन मुलीचे पालक घरी नसल्याची संधी साधत तिचा विनयभंग करीत छेडखानी केली हेती. या प्रकरणी आरोपीविरुद्ध बोदवड पोलिस स्टेशनला बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम आठ तसेच भादंवि 452, 354, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आरोप सिद्ध झाल्याने आरोपीस बाल अत्याच्चार प्रतिबंधक कायदा कलम 8 अन्वये तीन वर्ष सक्तमजूरी व तीन हजार रुपये दंड तसेच भादंवि कलम 452 अन्वये एक वर्षे सक्तमजूरी व दोन हजार रुपये दंड तसेच भादंवि कलम 504 अन्वये एक महिना सक्तमजूरी व एक हजार रुपये दंड सुनावण्यात आला. दंडातील पाच हजार रुपये पीडीतेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही देण्यात आले. सरकारतर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी युक्तीवाद केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !