सेवाकार्याचा बादशहा अनिलभाऊ चौधरी


भुसावळ :  सार्वजनिक जीवन जगत असताना विविध क्षेत्रात माझा मैत्रीचा गोतावळा निर्माण झाला त्यातीलच मित्रांना एक विचार-एकीच्या माळेत गुंफणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे अनिल भाऊ चौधरी. सामाजिक, राजकीय, उद्योग क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजमनावर सकारात्मक ठसा उमटवणारे अनिलभाऊ चौधरी एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहे. माणसाचे माणसांकडून तसेच चळवळीचे चळवळीतील कार्यकर्त्यांकडून कधीच अवमुल्यन होता कामा नये असं जगणं शिकवणार कृतीयुक्त विद्यापीठ म्हणजे अनिल भाऊ चौधरी आहेत. कुटुंबासाठी प्रेमळ, कार्यकर्त्यांसाठी आपुलकी असणारा दुष्काळ व पाणीटंचाईच्या काळात सर्वांना मदतीसाठी धावून जाणारा हा चेहरा जिल्ह्यात सर्वांना भावतो.

संघर्षाचे कटू अनुभव पचवले
त्यांचे कार्य विविध क्षेत्रात आहे. त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत, अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत परंतु केलेल्या कामाचा त्यांनी कधीच प्रसिद्धीसाठी वापर केला नाही. मानवी जीवनात भेट आणि वियोग या दैनंदिन गोष्टी असल्याचा माझा समज आहे. माझ्या सुदैवाने अनिलभाऊ चौधरी यांची व माझी भेट झाली आणि मी अनिलभाऊंचा चाहता कधी बनलो हे कळलेच नाही. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील माझ्या आयुष्याच्या वळणावर अनेक प्रकारचे अनुभव देणारी चरीत्र मला भेटत गेली. अनेकांपैकी जे काही चांगले सकारात्मक अनुभव देणारी चरीत्र माझ्या सदा-सर्वकाळ आठवणीत आहेत, त्यातील एक अनमोल आणि कर्तृत्ववान नाव म्हणजे आदरणीय अनिलभाऊ चौधरी होय. मित्रांचा मित्र कर्तृत्व समता, चैतन्य अशा अनेक गोष्टीचा अर्थ ज्या व्यक्तीकडून लक्षात येतो त्या व्यक्तीचे नाव आहे. अनिलभाऊ चौधरी. मी मागील 20 वर्षापासून पाहतोय एक आश्वासक आणि शब्दाला जागणारा, पायाला भिंगरी बांधून तळागाळातील जनतेसाठी धावून जाणारा, सेवाकार्याचा बादशहा नेतृत्व म्हणजे अनिलभाऊ चौधरी आहेत. अनिलभाऊ चौधरींच्या जीवनात वेदनादायी, असे कठीण घटना व प्रसंग सुद्धा या अवघड व कठीण संघर्षमय प्रसंगातून अनिलभाऊ यांना जावे लागले पण त्यांनी या सर्व प्रसंगांवर संयमाने यशस्वीरीत्या मात करून सहीसलामत बाहेर पडून दाखवले. वैयक्तिक जीवनात त्यांच्या अनेक कटू प्रसंग आले व आणले गेले परंतु त्यांनी संघर्षाचे कटू अनुभव पचवून प्रसंगी सर्वांच्या पाठीशी राहत पुन्हा हसत-मुखाने वागत सर्वांसमोर आपल्या व्यक्तिमत्त्वाचं वेगळेपण सिद्ध केलं. थोरा-मोठ्यांचा सहवास लहानशी जवळीकता युवकांची मैत्री आणि सर्व जाती धर्माची आपुलकीची भावना जपणारा त्यांचा गुण सर्वांनाच भावतो. शेतकरी कष्टकरी युवकांच्या विविध प्रश्नांची जाण असणारा लोकनेता त्यांच्या रूपाने सर्वांना सतत दिसतो. येणार्‍या सर्व दिवसांसाठी तयारीत रहा त्यांना सारखेच सामोरे जा जेव्हा म्हणशील तेव्हा घाव घाल आणि हातोडा होशील तेव्हा सुद्धा असा संदेश ते कृतीतून देतात.माझ्या जीवन प्रवासा मधील एक चांगलं व्यक्तिमत्त्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो.


दिलदार मनाचा राजा माणूस
दिलदार मनाचा राजा माणूस हा शब्द त्यांना शोभतो. मित्रासाठी दिलेल्या शब्दासाठी अनिलभाऊ चौधरी काय पण करू शकतात. निवडणुकीत अपयश आले तरी खचून न जाता आणि यश आले तरी डोक्यात हवा न देता कार्यकर्त्याचा त्यांचा समतोल दृष्टिकोन वाखाणण्याजोगा आहे. अनिलभाऊंना उद्योग व राजकीय क्षेत्रात मूळ कुटुंबाला फारसा वेळ देता येत नाही नेहमी धावपळ तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. आता मुलांनीच पुढील वारसा हातात घेतल्याने कौटुंबिक जीवनात कशाचीही कमतरता त्यांना नाही. एक नव्हे दोन नव्हे 50 हून अधिक कायदेशीर खटल्यांना त्यांना सामोरे जावे लागले. गोर-गरीबांच्या विकासासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी आदरणीय अनिलभाऊ चौधरी यांनी कल्पकतेने सर्व समाजघटकांना सोबत घेऊन उन्हाळ्यात पाण्याचे टँकर असतील, पाणपोई असतील गोरगरीबांना प्रत्यक्ष मदत असेल, अन्नधान्य असेल े पुरविण्याचे मोठे कार्य केले आहे. हे कार्य करत असताना प्रसिद्धीच्या मागे न धावता कोट्यावधी रुपयांची गोरगरीबांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव अलौकिक व अनमोल आहे.

नेहमीच सढळ हाताने केली मदत
गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, शिवजयंती उत्सव वेगवेगळ्या महापुरुषांची जयंती उत्सव यासाठी ते सढळ हाताने मदत करतात. गोरगरीब वंचित घटकाला जीवन आनंदाने जगता आले पाहिजे या एकाच उदात ध्येयानं प्रेरित झालेले अनिल भाऊ आहेत हे जेव्हा मला जाणवलं तेव्हा त्यांची आणि माझी एक असल्याची जाणीव झाली आणि आमची भेटीचे रूपांतर निकोप निस्वार्थ भावनेच्या मैत्रीत झाले. अन्यायाविरुद्ध चीड असणारा त्यांचा स्वभाव युवकांना प्रामुख्याने खुप भावतो. अनुभवी प्रतिभाशाली आणि धडपडणारी त्यांचे आत्मभान जळगाव जिल्ह्याच्या रावेर जळगाव लोकसभा नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक विकासाच्या क्षेत्रात एक विचार आणि नवीन पर्व स्थापन करेल यात शंका नाही. अनिलभाऊ म्हणजे उत्तमा साठी अहर्निश धडपड करणारे राजकारणातील सरळ मार्गी विश्वास पात्र देव माणूस . त्यांच्या व्यक्तिमत्त्व मधील जिद्द, परीश्रम, मोठा उत्साह सातत्याने जनसंपर्क ठेवण्याची त्यांची वृत्ती, मेहनत घेण्याची प्रवृत्ती,राजकीय, सामाजिक शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक सामाजिक, पत्रकारिता ,साहित्य चळवळीत सर्वांशी असणारा त्यांचा स्नेहभाव आणि जनसंपर्क वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या अखंड धडपडीच्या काहीही प्रतिरोध करू शकत नाही व काळ वेळ समस्या अडचणी ह्या कोणत्याही मर्यादा त्यांच्या कार्याचा अवरोध कधीच बनू शकत नाहीत जीवनात अनेक सामाजिक राजकीय व्यासपीठांवर त्यांना आजपर्यंत गौरव केले गेलेआहे. त्यांच्या अथक परिश्रम व अविरत धडपड आणि परिदृढ जिद्दीला तोड नाही हे एक बिनतोड व्यक्तिमत्व आहे.मित्र म्हणून माझा प्रेरक प्रणाम. शतायुषी जीवनासाठी शुभ प्रेरणा. वाढदिवसानिमित्त शब्दप्रपंच मांडण्याची सुवर्ण संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.

शब्दांकन- तथा लेखन श्री किशोर पाटील कुंझरकर
राष्ट्रीय कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ प्रणित शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद
राज्य महासचिव- महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समिती
राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक (मो.7030887190)




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !