भुसावळला श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिट सुरू
भुसावळ : शहरासह परीसरातील अनेक रुग्णांना डायलिसिससाठी जळगाव व अन्य ठिकाणी जावे लागत असे परंतु शहरातील आयडीबीआय बँकेशेजारील सुराणा राईस टॉवरजवळ असलेल्या श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अत्यावश्यक सेवेसोबतच डायलिसीस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लॉकडाउन काळातही अहोरात्र अविरत सेवा देत आहे. रुग्णालयाच्या अत्यावश्यक सेवेचा लाभ रुग्णांना होत आहे. किडनी आणि अन्य आजारांच्या रुग्णांना डायलिसीसची आवश्यकता भासत असते. अशा रुग्णांना नियमित डायलिसीस करावे लागते. पूर्वी ही सुविधा भुसावळ परीसरात नसल्याने जळगाव व अन्य ठिकाणी रुग्णाला जावे लागत असे मात्र डायलिसिस सुविधा शहरात सुरू झाल्याने अनेक रुग्णांना सोयीचे होणार आहे. अत्यावश्यक सेवा सोबतच डायलिसिस युनिट रुग्ण सेवेसाठी 24 तास उपलब्ध झाले आहे .

