शेतकरी विरोधी कायदा रद्दसाठी भुसावळात किसान मोर्चा
भुसावळ : शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी कामगार नेते जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात विविध दहा संघटनांतर्फे यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते भुसावळ शहर पोलिस ठाण्यापर्यंत किसान मोर्चा काढण्यात आला. खांद्यावर दुशेर घेऊन कामगार नेते जगन सोनवणे व पदाधिकारी शहर पोलिस ठाण्यापर्यंत निघाले. यावेळी केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख रिाकेश भाई बग्गन, ग्रामीण जिल्हा प्रमुख संतोष मेश्राम, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हा प्रमुख आरीफ भाई शेख, भुसावळ तालुकाप्रमुख शगीर शाह, जिल्हा उपाध्यक्ष अनिल सुरवाडे, अविनाष गुप्ता, भारतीय ओडबसम क्रांती जिल्हा प्रमुख, श्री छत्रपती सेना भुसावळ तालुकाप्रमुख प्यारेलाल यादव, जय सेवालाल जिल्हा प्रमुख विशाल पवार, जय सेवालाल भुसावळ तालुकाप्रमुख मनोहर पवार, परशुराम लोहार, भारतीय संविधान बचाव सेना तालुकाप्रमुख संजय उबाळे, भारतीय ओडबसम क्रांती तालुकाप्रमुख किरण तायडे, वरणगाव शहर प्रमुख शाह, चंदू पहेलवान, राष्ट्रीय मजदूर सेना सुनील ठाकुर व गजानन चर्हाटे सहभागी झाले.


