भुवनेश्वर-एलटीटी तसेच विशाखापट्टनम-गांधीधाम साप्ताहिक विशेष गाडीच्या वेळेत बदल
भुसावळ : भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस तसेच विशाखापट्टनम-गांधीधाम साप्ताहिक तसेच विशाखापट्टनम-लोकमान्य टिलक टर्मिनस साप्ताहिक उत्सव विशेष उत्सव गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला असून रेल्वे प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष उत्सव गाडी
अप 02880 भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष उत्सव गाडी 13 ते 31 डिसेंबरदरम्यान दर सोमवारी व गुरुवारी प्रस्थान स्टेशनहुन 7.20 वाजता प्रस्थान केल्यानंतर दुसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस एक वाजता पोहोचणार आहे. या गाडीला अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02879 लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर विशेष उत्सव गाडी 15 डिसेंबर ते 2 जानेवारीदरम्यान दर बुधवारी व शनिवारी प्रस्थान स्टेशनहून 12.15 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी भुवनेश्वर स्टेशनला सात वाजता पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, मनमाड, भुसावळ व अकोला रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

विशाखापट्टनम-गांधीधाम साप्ताहिक विशेष उत्सव गाडी
अप 08501 विशाखापट्टनम-गांधीधाम विशेष उत्सव गाडी 17 ते 31 डिसेंबरदरम्यान दर गुरुवारी प्रस्थान स्थानकावरून 5.35 वाजता सुटल्यानंतर तिसर्या दिवशी गांधीधामला 5.55 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 08502 गांधीधाम-विशाखापट्टनम विशेष उत्सव गाडी 20 डिसेंबर ते 3 जानेवारीदरम्यान दर रविवारी प्रस्थान स्थानकावरून 11.5 वाजता सुटल्यानंतर तिसर्या दिवशी विशाखापट्टनम स्टेशनला 10.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
विशाखापट्टनम-लोकमान्य टिलक टर्मिनस साप्ताहिक उत्सव विशेष गाडी
अप 02857 विशाखापट्टनम-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष उत्सव गाडी 13 ते 27 डिसेंबरदरम्यान दर रविवारी प्रस्थान स्टेशनहुन 8.20 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस एक वाजता पोहोचणार आहे. या गाडीला अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02858 लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टनम विशेष उत्सव गाडी 15 ते 29 डिसेंबरदरम्यान दर मंगळवारी प्रस्थान स्थानकावरून 12.15 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी विशाखापट्टनम स्टेशन पाच वाजता पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, मनमाड, भुसावळ, अकोला या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
पूरी-सुरत साप्ताहिक विशेष उत्सव गाडी
डाऊन 02828 सुरत-पूरी साप्ताहिक विशेष उत्सव गाडी 15 ते 29 डिसेंबरदरम्यान दर मंगळवारी प्रस्थान स्टेशनहुन 8.05 वाजता प्रस्थान करेल व दुसर्या दिवशी पूरी स्टेशन 8.35 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगाव, भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 02827 पूरी-सुरत साप्ताहिक विशेष उत्सव गाडी 13 ते 27 डिसेंबरदरम्यान दर रविवारी प्रस्थान स्टेशनहुन 7.45 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी सुरतला 3.20 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला भुसावळ व जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
पूरी-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष उत्सव गाडी
अप 02866 पूरी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष उत्सव गाडी 15 ते 29 डिसेंबरदरम्यान दर मंगळवारी प्रस्थान स्टेशनहुन सकाळी सहा वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस एक वाजता पोहोचणार आहे. या गाडीला भुसावळ व मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. वाजता पहुचेल. डाऊन 02865 लोकमान्य टिळक टर्मिनस – पूरी विशेष उत्सव गाडी 17 ते 31 डिसेंबरदरम्यान दर गुरुवारी प्रस्थान स्थानकावरून 12.15 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी पूरी स्टेशनवर 8.35 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड व भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

