ब्रह्मलीन संतश्री जगन्नाथ महाराज यांचा 19 वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार


महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज : 13 व 14 रोजी विविध कार्यक्रम

फैजपूर : शहरातील सतपंथ मंदिर संस्थानचे गुरुवर्य ब्रह्मलीन संतश्री जगन्नाथ महाराज यांचा 19 वा पुण्यतिथी महोत्सव अखंड नामसंकीर्तनाने साजरा केला जाणार असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. कोरोना महामारीमुळे प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून सामूहिक श्रद्धांजली सभेचे आयोजन केले नसून फक्त समाधी दर्शन व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

14 समाधीस्थळी पादुका पूजन
पंचक्रोशीतील संत-महंत तसेच लोकप्रतिनिधी व भाविकांच्या उपस्थितीत 13 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सतपंथ संस्थानच्या मंदिरात महापूजा केली जाणार आहे. 14 डिसेंबर रोजी गुरुवर्य जगन्नाथ महाराज समाधीस्थळी (शेतात) सकाळी 10 वाजता श्रद्धांजली व पादुका पूजन तसेच सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत अखंड हरीनाम संकीर्तन होणार आहे. याच दिवशी सकाळी 10 ते दुपारी दोन वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचा लाभ होईलख असे सतपंथ संस्थानचे गादिपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी कळविले आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी वैयक्तिक आमंत्रण किंवा पत्रिका न देता हेच आमंत्रण समजून पुण्यतिथी महोत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन महाराजांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !