मुक्ताईनगरात काँग्रेसतर्फे कृषी बिलाची होळी
मुक्ताईनगर : संपूर्ण देशात केंद्र सरकारने आणलेल्या कृषी बिलाला विरोध शेतकर्यांकडून होत असून मंगळवारी भारत बंदची हाक दिल्यानंतर मुक्ताईनगरातील काँग्रेस व महाविकास आघाडीतर्फे मुख्य चौकात केंद्र सरकारच्या कृषी बिलाची होळी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील व्यापार्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवत बंदला प्रतिसाद दिला.
यांची होती उपस्थिती
यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव आसीफ खान, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सुनील पाटील, स्वीय सहायक प्रवीण चौधरी, जिल्हा अल्पसंख्यांक संघटक अफसर खान, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, कृउबा सभापती निवृत्ती पाटील, राजू माळी, काँग्रेस युवक विधान सभाध्यक्ष निरज बोराखडे, बी.डी.गवई, शहराध्यक्ष पवन खुरपडे, दिलीप पाटील, गणेश टोंगे, कुणाल गवई, योगेश पाटील, सईद खान, युवक अध्यक्ष वसीम खान, सलीम बेपरी, सुरेश भोलाणे, निखील चौधरी, शकील आझाद, दिनकर भालेराव, फिरोज टेलर, रीयाज खान, अनिल सोनवणे, रोहित भालेराव, संजय धामोडे आदी उपस्थित होते.

कुर्हा गावात बंदला शंभर टक्के प्रतिसाद
मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा येथे भारत बंद शंभर टक्के प्रतिसाद लाभला. कृषी कायद्याचा यावेळी निषेध करण्यात आला. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस रवींद्र दांडगे, ग्रा.पं.सदस्य अनंता पाटील, रणजीत गोयंका, गजानन राजाराम पाटील, शेतकरी नेते राजकुमार पाटील, श्रीकांत बापू पाटील, राजुशेठ खंडेलवाल, मयूर साठे, सुशील भुते, संदीप वाकुळकर, शंकर मोरे, विवेक पाटील, प्रमोद भोलाणकर, बाबूलाल चोपडे, किसना पाटील, प्रफुल्ल भुते, अफ्फु मिस्त्री, प्रल्हाद मोरे, शुभम आसळकर, विनोद पाटील, उल्हास पाटील, डोळे पावना उपस्थित होते.

