यावलमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
यावल : यावल शहरात महाविकास आघाडीने भारत बंदला पाठिंबा दर्शवला तर बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला. भुसावळ टी पॉईंटजवळ आंदोलन मंगळवारी सकाळी 10 वाजता करीत कृषी विधेयकास विरोध करण्यात आला. काही वेळ या ठिकाणी रास्ता रोखण्यात आला व शहरातील व्यावसायीकांना बंदचे अवाहन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परीषदेचे गटनेता प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीरखान, राष्ट्रवादीचे विजय पाटील, कडू पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, जगदीश कवडीवाले, करीम मण्यार, सुकदेव बोदडे, हाजी गफ्फार शाह, अमोल भिरुड, संदीपभैय्या सोनवणे, काँग्रेससेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, चंद्रकला इंगळे, अॅड.देवकांत पाटील, प्रशांत पाटील, संतोष धोबी, नगरसेवक समीर मोमीन, सागर देवांग, हुसेन तडवी, कामराज घारू, नईम शेख, अनिल जंजाळे, बशीर तडवी, मोहसीन खान, हितेश गजरे, सैय्यद गनी शेख, सकलेंन शेख, विक्की पाटील, राहुल बारी, विक्की सोनवणे, प्रवीण पाटील, समाधान पाटीलसह मोठ्या संख्येत महाविकास अघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बाजार समितीत कामकाज बंद
मंगळवारी यावल बाजार समितीचे कामकाज बंद ठेवण्यात आल. सकाळी बाजार समितीच्या मुख्य आवारात कर्मचार्यांनी व व्यापार्यांनी आंदोलन केले. याप्रसंगी सचिव स्वप्नील सोनवणे, सहा.सचिव विजय कायस्थ, लेखापाल योगेश चौधरी, निरीक्षक किशोर सोनवणे, लिपिक नंदकिशोर बारी, विवेक भालेराव, डी.यु.महाजन, शिपाई शकील तडवी, विनोद सोनवणे यांच्यासह अस्थायी कर्मचारी तसेच व्यापारी प्रतिनिधी पुंजोशेठ पाटील, व्यापारी हाजी अजिझ खान, धीरज भोळे आदींची उपस्थिती होती.

