आदर्श शिक्षक किशोर पाटील-कुंझरकर यांचा मृतदेह आढळला


घात-पाताचा संशय? : शवविच्छेदनानंतर कारण होणार स्पष्ट

एरंडोल : आदर्श शिक्षक म्हणून जिल्ह्यात ख्याती असलेल्या गालापूर जि.प.शाळेचे शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह मंगळवारी संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पळासदळ शिवारात कुंझरकर यांचा मृतदेह आढळला असून मंगळवारी सायंकाळी ते घराबाहेर पडल्यानंतर परतले नसल्याचे सांगण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रयोगशील शिक्षक म्हणून ख्याती
किशोर पाटील हे प्रयोगशील शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या सौभाग्यवती या देखील शिक्षिका आहेत. किशोर पाटील यांचा मृतदेह हा संशयास्पद स्थितीत आढळून आला असून त्यांचा घातपात तर झाला नाही ना? असादेखील प्रश्‍न आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर कुंझरकर यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांच्या अंगावरील कपडेदेखील फाटलेले असल्याचे सांगण्यात आले.


 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !