लॉकडाऊननंतर आठ महिन्यांनी वाजली शाळेची घंटा
भुसावळ तालुक्यातील 59 शाळेत 1208 विद्यार्थ्यांची उपस्थिती
भुसावळ : कोरोना संसर्गानंतर तब्बल आठ महिन्यानंतर शाळांची घंटा अनलॉक नंतर मंगळवारी वाजली. पहिल्या दिवशी शहर व तालुक्यातील 59 शाळेत नववी ते बारावीपर्यतचे विद्यार्थी शाळेत आले होते मात्र भारत बंद असल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. पहिल्याच दिवशी एक हजार 208 विद्यार्थी शाळेत आले तर एक हजार 129 क्षकांपैकी एक हजार 72 शिक्षकांची उपस्थिती होती. कोरोना संसर्गाच्या लॉक डाऊनमुळे शाळा बंद होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने सरकारने 8 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील सर्वच शाळांमध्ये सोमवारी निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबवण्यात आली. मंगळवारी सकाळी शाळांची घंटा वाजल्यानंतर नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शाळा गाठली. काही ठिीकाणी शाळा सकाळी होत्या तर काही ठिकाणी दुपारी 12 वाजता भरवण्यात आल्या.
तपासणीनंतर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश
शाळेत आठ महिन्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच शिक्षकांनी उभे राहून येणार्या विद्यार्थ्यांचे स्वागत करीत त्यांची ऑक्सीमीटरने तपासणी केली तर थर्मल गनने तापमान मोजण्यात आले. नंतरच त्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला तसेच प्रत्येक बाकावर एका विद्यार्थ्याला बसण्याची परवानगी देण्यात आली तसेच पालकांचे संमतीपत्र विद्यार्थ्यांकडून घेण्यात आले.

सॅनेटायझर, मास्क बंधनकारक
शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तोंडाला मास्क लावणे सक्तीचे
करण्यात आले तसेच शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातावर सॅनेटायझर
देण्यात आले. वर्गातील बेंचवर सुध्दा शाळेतर्फे सॅनेटायझर फवारण्यात
आले होते. प्रत्येक
बीओंची शाळांना भेट
शहरासह ग्रामीण भागात मंगळवारपासून शाळा सुरू झाल्याने शहरातील आणि ग्रामीण भागातील काही शाळांना गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांनी दीपनगर आणि शहरातील काही शाळांना भेट देऊन शाळांची पहाणी केली. शासनाने दिलेल्या नियमोंचे पालन केले जात आहे का नाही ? याची पाहणी करण्यात आली. काही शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या.

