शेतात पाणी शिरल्याने वाद : हाणामारीत दोघे जखमी
भुसावळ : तालुक्यातील वराडसीम येथील रहिवासी लिलाधर रामू भारंबे यांच्या शेतात विश्वनाथ भारंबे यांच्या शेतातील पाणी शिरल्याने त्याचा जाब विचारला असता लिलाधर भारंबे व रोहीत भारंबे यांनी काठी व विळ्याने मारहाण केल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील वराडसीम येथील रहिवासी लिलाधर भारंबे यांच्या शेतात शेजारील विश्वनाथ भारंबे यांच्या शेतातील पाणी जात असल्याने याचा जाब विश्वनाथ भारंबे यांना विचारला असता, यात वाद होऊन लिलाधर भारंबे यांच्या डोक्यात काठीने विश्वनाथ भारंबे यांनी वार केले. यात लिलाधर भारंबे जखमी होऊन खाली कोसळले. याच वेळी त्यांचा मुलगा मयूर हा आला असता त्यानेही जाब विचारला असता, रोहीत भारंबे यांचे मयूर यांच्यशी वाद झाले. यावेळी रोहित याने तेथे पडलेल्या विळ्याने मयूर याच्यावर वार केला.यात तो जखमी झाला. त्यांच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे. लिलाधर आणि मयूर यांना प्रत्येकी दहा टाके पडले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. लिलाधर भारंबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विश्वनाथ भारंबे व रोहित भारंबे यांच्या विरूध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक रूपाली चव्हाण पुढील तपास करीत आहे.

