वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्ह्यात लावलेले बॅनर्स, फलक काढावेत
युवा हृदय सम्राट अनिल चौधरी यांचे चाहत्यांसह कार्यकर्त्यांना आवाहन
भुसावळ : युवा हृदय सम्राट अनिल छबीलदास चौधरी यांचा मंगळवार, 8 डिसेंबर रोजी चाहत्यांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह कार्यकर्त्यांनी भुसावळ शहरासह जिल्ह्यातील विविध भागात तसेच विद्युत पोलवर शुभेच्छा देणारे फलक लावले असल्याने आता हे फलक काढून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी केले आहे.
चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आल्यानंतर असून या बंदला चौधरी यांनी पाठिंबा दर्शवत शेतकरी हित डोळ्यापुढे ठेवून चौधरी यांनी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले होते. तापी नगरातील बंगल्यावर मंगळवारी दुपारी चार ते नऊ दरम्यान अनिल चौधरी यांच्यावर मात्र चाहत्यांसह कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.


