गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसासह तिघे आरोपी चोपडा पोलिसांच्या जाळ्यात


तीनही अटकेतील आरोपी सांगली जिल्ह्यातील : पोलिस निरीक्षक अवतारसिंग व्हाण यांची गोपनीय माहितीवरून कारवाई

चोपडा : चोपडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना उमर्टी येथून काही संशयीत गावठी कट्ट्याची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोन पथके तयार करून सापळा रचल्यानंतर एका चारचाकीतून प्रवास करणार्‍या तीन संशयीताच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता ही कारवाई चुंचाळे ते चौगाव रस्त्यावर करण्यात आली. आरोपींविरुद्ध चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली.

या आरोपींना केली अटक
अटकेतील आरोपींमध्ये संदीप आनंदा निकम (28, बुधगाव, ता.मिरज, जि.सांगली), विशाल नागेश कांबळे (26, अहिल्यानगर झोपडपट्टी, माधवनगरजवळ, ता.मिरज, जि.सांगली) व चालक प्रदीप अरुण सावळे (35, कर्नाड रोड, माधवनगर, मिरज, जि.सांगली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून चारचाकी (एम.एच.50 ए.0807) जप्त करण्यात आली आहे. आरोपींच्या ताब्यातून 30 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, तीन हजार रुपये किंमतीचे तीन जिवंत काडतूस, तीन लाख रुपये किंमतीची चारचाकी तसेच 13 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल मिळूनप तीन लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मिलिंद सपकाळे यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक संदीप पारधी करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !