वलसाड-मुजफ्फरपूर विशेष गाडीच्या वेळेत बदल


भुसावळ : वलसाड-मुजफ्फरपूर व मुजफ्फरपूर-वलसाड विशेष गाडीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. संपूर्णपणे आरक्षित असलेल्या या गाडीत केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या रेल्वे प्रवाशांना प्रवेश मिळणार असून प्रवाशांना कोविड 19 नियमांचे पालन करावे लागणार आहे.

वलसाड -मुजफ्फरपूर विशेष गाडी
डाऊन 09051 वलसाड-मुजफ्फरपूर विशेष गाडी 12 डिसेंबरपासून दर शनिवारी प्रस्थान स्टेशनहुन 10.15 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी मुजफ्फरपूर स्थानकावर 6.50 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगावसह भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 09052 मुजफ्फरपूर-वलसाड विशेष गाडी 14 डिसेंबरपासून दर सोमवारी प्रस्थान स्टेशनहुन 8.10 वाजता रवाना होईल व तिसर्‍या दिवशी वलसाड स्टेशनला 7.10 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला भुसावळसह जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !