भुसावळात इंजिनिअरींग प्रवेशासाठी मोफत मार्गदर्शन
भुसावळ : प्रथम वर्ष इंजिनिअरींग व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग साठीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून यात 9 ते 15 डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन व डॉक्युमेंट अपलोड करावयाचे आहे. रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असून विद्यार्थ्याच्या सोयीसाठी भुसावळात काँन्सिलिंग सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. या सेंटरवर विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अचूक फॉर्म भरण्याची व डॉक्युमेंट अपलोड करण्याची सुविधा मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. योग्य मार्गदर्शन व मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी सहा दरम्यान रेहांत डिजिटल सर्विसेस, जुना सातारा, अथश्री हाईट्स, शहीद स्मारक शेजारी, भुसावळ 7083320071 व 7709044901 येथे संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.

