जळगावातील विवाहितेचा एक लाखांसाठी छळ


रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांवर गुन्हा

जळगाव : जळगाव येथील माहेर असलेल्या 28 वर्षीय विवाहितेने प्लॉट घेण्यासाठी एक लाख रुपये न आणल्याने तिचा सासरच्यांनी छळ केल्याप्रकरणी अहमदाबाद येथील पतीसह चार जणांवर रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा
शहरातील पिंप्राळा शिवारात माहेर असलेल्या 28 वर्षीय विवाहितेचे अहमदाबाद येथील पंकज मुरलीधर विसपूते यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती पंकज विसपुते यांनी अहमदाबाद येथे प्लॉट घेण्यासाठी माहेरहुन 1 लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. यात सारसे मुरलीधर चिंतामण विसपुते, सासू संगीता मुरलीधर विसपूते, दीर मयूर मुरलीधर विसपुते आणि प्रसाद मुरलीधर विसपूते (सर्व रा.अहमदाबाद) यांनीदेखील टोचून बोलणे सुरू केले. छळाला कंटाळून 28 वर्षीय विवाहिता जळगाव येथे माहेरी आई-वडिलांकडे आली व तिने घडला प्रकार सांगितला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात पतीसह सासरचे मंडळी अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रध्दा रामोशी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !